Home Uncategorized पुणे-बेंगळुरू NH4 महामार्ग विस्तारीकरणात सर्व त्रुटी दूर करू रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांची खा. संजय मंडलिक यांना ग्वाही.

पुणे-बेंगळुरू NH4 महामार्ग विस्तारीकरणात सर्व त्रुटी दूर करू रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांची खा. संजय मंडलिक यांना ग्वाही.

6 second read
0
0
480


खा. संजय मंडलिक यानी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणे ते बेंगळुरूला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 च्या 4-लेनवरून 6-लेनच्या विस्तारीकरणाच्या कामातील अनेक त्रुटी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या. श्री. नितीन गडकरी यानी पुणे-बेंगळुरू NH4 महामार्ग विस्तारीकरणात सर्व त्रुटी दूर करू याची ग्वाही खा. संजय मंडलिक यांना दिली. त्या वेळी तांत्रिक सल्लागार व पुल बांधकामातील तज्ञ श्री. बि.डी.थेंग ही उपस्थित होते. त्यांना या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी संबधिताना मार्गदर्शन करण्याच्या सुचना देण्यात आल्या.


कोल्हापूर, सातारा, आणि सांगली येथील लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी या महामार्गातील दिसणाऱ्या त्रुटींबाबत बैठक घेऊन चर्चा केली होती. पंचगंगा नदीजवळील पूल त्याच्या दोन्ही बाजूंनी भरलेल्या भरावावर उतरतो जो पावसाळ्यात बांधाचे काम करतो आणि पुराचे पाणी खालच्या प्रवाहात सहज जाण्यापासून रोखतो. त्यामुळे कोल्हापूर शहरातील बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे बास्केट ब्रीज, पोहच रस्त्याचे कॉलम स्ट्रक्चर वापरून काम करावे लागेल ज्यामुळे पूरस्थितीत पाण्यासाठी जाण्याचे क्षेत्र वाढेल व पुराचे पाणी जलद निघून जाईल. या बाबतीत लोक जागरण करत असलेली वृत्तपत्रे, अनेक संघटना, असोसिएशन आँफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअरस यांच्या मागण्या श्री. गडकरी यांना सांगितल्या.
कागल पासून घुणकी पर्यत विस्तारीकरणाच्या कामातील अनेक त्रुटी सांगताना कागल, विकासवाडी, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, उचगाव, नागाव, संभापूर, अंबप, किणी येथे उंच व रुंद उड्डाण पुलाची गरज आहे. या पुलांची कामे कॉलम स्ट्रक्चर वापरून करावे लागेल. पावसाळ्यात पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे करता यावा यासाठी बोगदे मोठे करणे महत्त्वाचे आहे.
या चर्चैनंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यानी NH4 महामार्ग विस्तारीकरणात सर्व त्रुटी दूर करू याची ग्वाही दिली. यावेळी चेंबर आँफ काँमस् चे संचालक श्री. विज्ञानंद मुंढे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…