Home Uncategorized मलकापूर आयसीटीसीच्या वतीने बालकांना दिवाळी भेट

मलकापूर आयसीटीसीच्या वतीने बालकांना दिवाळी भेट

3 second read
0
0
139

मलकापूर प्रतिनिधी:

एच.आय.व्ही. संसर्गितांचे प्रमाण कमी येत असले तरी या आधी संसर्गित झालेल्या बालके मोठी होऊ लागली आहेत. समाजाकडून शंकेच्या नजरेने पाहिले जाते. बऱ्याच मुलांचे माता पिता नाहीत. अशा परिस्थितीत या मुलांची दिवाळी आनंदाची व्हावी म्हणून, समाजातील काही घटक धडपडत असतात हे अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार मलकापूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. महेश पाटील यांनी काढले.

आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मलकापूर व विहान प्रकल्प कोल्हापूर यांच्यावतीने एचआयव्ही संसर्गित बालकांसाठी दिवाळी भेट कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण रुग्णालय मलकापूर येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ चंद्रकांत गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते सागर यादव यांच्या सहकार्याने मुलांना भेटवस्तू वाटप केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ .विशाल सकटे होते. प्रास्ताविक समुपदेशक क्रांतिसिंह चव्हाण यांनी केले. याप्रसंगी प्रयोगशाळा तंत्रज्ञ चंद्रकांत गायकवाड, विहान चे संदिप पाटील यांच्यासह बालके व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…