Home Uncategorized राशिवडेतील गाडगेबाबा सेवा मंडळाने गोड केली उपेक्षितांची दिवाळी.

राशिवडेतील गाडगेबाबा सेवा मंडळाने गोड केली उपेक्षितांची दिवाळी.

4 second read
0
0
299

राशिवडे प्रतिनिधी :- कृष्णा लाड.

आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी श्री संत गाडगेबाबा सेवा मंडळ राशिवडे बु यांच्या वतीने शेंन्डापार्क येथील कुष्टरोग रूग्णानां दिवाळीचा फराळ, साबण, तेल, टाॕवेल, पाण्याच्या बाॕटल वाटप करण्यात आले. उपेक्षितांना ही दिवाळी सणाचा आनंद मिळावा यासाठी या सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. कार्यक्रम संपल्या नंतर एका जेष्ठ रूग्णाने बोलतानां माझ्या कुटुंबातील कोणीही आम्हाला भेटायला येत नाही पण आपण सर्व मंडळी दरवर्षी न विसरता आमच्या साठी येथे येऊन आम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देऊन जे साहित्य देऊन आमची काळजी करता त्यामुळे तुम्हीच आमचे कुटुंब आहात अशी भावनिक दाद दिली. यावेळी उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात अश्रू दाटून आले.
संजय तापेकर, दत्ताकाका गुळवणी, सरदार भैय्या, महेश मोरे, सचिन तापेकर, सदानंद ढोणे, संतोष गायकवाड, सुहास तोडकर यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…