Home Uncategorized भोगावती ची निवडणूक आता होणार रंगतदार.

भोगावती ची निवडणूक आता होणार रंगतदार.

3 second read
0
0
375

रशिवडे प्रतिनिधी :- कृष्णा लाड.

सुरुवातीच्या टप्प्यात एकीकरणावर भर देणारे नेते आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत. जे विरोधात होते ते एकत्र आलेत आणि जे एकत्र होते ते विरोधात गेलेत असा काहीसा न समजणारा प्रकार या निवडणुकीच्या निमित्ताने झालेला दिसतोय. आज माघारीच्या अंतिम दिवशी आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार आमदार पी एन पाटील, ए वाय पाटील, माजी आमदार संपतराव पवार पाटील आणि गोकुळ अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांच्या सत्तारूढ आघाडी विरोधात भारतीय जनता पार्टी, सदाशिवराव चरापले गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची आघाडी लढताना दिसेल. विशेष म्हणजे इच्छुक असणाऱ्या सर्वच पक्षांमध्ये दुफ्ली निर्माण झाल्याचे प्रकर्षाने जाणवले आहे. एकमेव शेका पक्ष त्याला अपवाद होता पण त्यामध्येही फारकत होऊन दुफळी नव्हे तर तिफळी निर्माण झाल्याचे दिसतय. काहीजणांनी दुसऱ्या आघाडीला, तर काहीजणांनी तिसऱ्या आघाडीला बळ देण्याचं आणि त्यामधून लढण्याचही निश्चित केलंय. त्याबरोबरच कारखाना संस्थापक दादासाहेब पाटील यांचे थेट वारसदार धैर्यशील पाटील कौलवकर यांनी स्वतःच पॅनलची बांधणी करून स्वबळ आजमावण्याचं निश्चित केले आहे. माघारीच्या अंतिम दिवशी या घडामोडी पाहता भोगावतीची निवडणूक टोकाच्य इर्शेची आणि रंगतदार होईल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…