Home Uncategorized आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शिरोळ तालुका दौऱ्याची सुरवात

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शिरोळ तालुका दौऱ्याची सुरवात

3 second read
0
0
127

शिरोळ : प्रतिनिधी

माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गुरुवारपासून शिरोळ तालुक्याच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. तीन दिवसाच्या या दौऱ्यात जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय आढावा घेतला जाणार असून गुरुवारी दत्तवाड येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात दत्तवाड, नवे दानवाड, जुने दानवाड, टाकळी, टाकळीवाडी, घोसरवाड या गावांमधील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, शेतकरी या सारख्या सर्व घटकांशी संवाद साधताना गावागावातील विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली. गावातील अडचणी समजून घेतल्या. नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निवारण करण्याचे आदेश दिले.

या आढावा बैठकीस तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी शंकर कावितके वीजवितरणचे कार्यकारी अभियंता श्री.गोंदिल यांच्यासह कृषी विभाग, भूमी अभिलेख, महसूल विभाग, आरोग्यासह पाटबंधारे व इतर सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…