Home Uncategorized विजेचा शॉक लागुन तरुणाचा मृत्यू मलकापूर

विजेचा शॉक लागुन तरुणाचा मृत्यू मलकापूर

2 second read
0
1
1,273

मलकापूर प्रतिनिधी –

कडवे ता. शाहूवाडी येथील तरुण सतिश रंगराव पाटील वय ३५ याला इलेक्ट्रीक गणचा शॉक लागुन जागीच मुत्यू झाला. याची नोंद शाहूवाडी पोलीसात झाली आहे. ही घटना गुरुवार दि ५ रोजी सकाळी ११ वाजता घडली. घटना स्थळावरून समजलेली महिती अशी कडवे येथील तरुण सतिश पाटील यांनी मलकापूरातील मलकापूर – कोकरूड रस्त्यावर असणारे विक्रम पडवळ यांचे गाडया धुण्याचे सव्हिसिंग सेंटर चालविण्यासाठी घेतले होते.

गुरुवारी सकाळी नेहमी प्रमाणे त्यांनी सव्हिसिंग सेंटर उघडले मशीन चालू करून काही गाडयावर पाणी मारून धुतल्या. अचानक ११ वाजता त्याला गाड्या धुण्याच्या मशीन गणचा जोराचा शॉक लागुन जागीच मुत्यू झाला. ही घटना शेजारी असणाऱ्या नागरीकांना समजताच त्यांनी तातडीने उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने कडवे गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पाश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुली, भाऊ असा परिवार आहे.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…