Home वायरल जांभळाच्या झाडावरून पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

जांभळाच्या झाडावरून पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

2 second read
0
2
3,667

प्रतिनिधी राधानगरी,

     राधानगरी तालुक्यातील कपलेश्वर रोडवर असणाऱ्या जांभळाच्या झाडावरून पडल्याने सुरज भाऊराव पाटील या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.  मयत तरुण हा सांगली जिल्ह्यातील बत्तीसशिराळा तालुक्यातील इंग्रूळ या गावाचा रहिवासी आहे. सुरज हा गाडीतून प्रवासी घेऊन मांगोली या सोडण्यासाठी आपल्या ओमणी गाडीतून आला होता.प्रवाशांना सोडून परत जाताना रस्त्याकडेला असलेल्या जांभळाच्या झाडावरील जांभळे काढण्यासाठी तो थांबला.

जांभळे तोडण्यासाठी झाडावर चढत असताना तो पाय घसरून खाली पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला.
सदरच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड, कृष्णात यादव, प्रदीप गुरव, पोलीस पाटील वसुधा पाटील, मानसिंग काटकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासणीसाठी सोलांकुर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आला आहे. पुढील तपास हा राधानगरी पोलीस करत आहेत.

कोल्हापुरी कारभार साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…