Home Kolhapur सापावर पाय पडल्याच्या भीतीने बालकाचा मृत्यू

सापावर पाय पडल्याच्या भीतीने बालकाचा मृत्यू

3 second read
0
0
2,257

कोल्हापूर : वाकरे (ता. करवीर) येथील रहिवासी असणाऱ्या बालकाचा सापावर पाय पडल्याच्या भीतीने ताप येऊन काल (17 सप्टेंबर) मृत्यू झाला. अर्णव नवनाथ चौगले (वय 8) असे मृत बालकाचे नाव आहे.

एका खाजगी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत होता. गुरुवारी शाळेला गेला असून शाळेतून आल्यानंतर त्याला जोरात ताप आला. गावातील आणखी एका व्यक्तीला त्याच दिवशी सर्पदंश झाल्याची चर्चा होती. या भीतीने अर्णव माझा ही सापावर पाय पडला, असे सांगत होता. याच भीतीपोटी त्याला ताप आला. पालकांनी भीतीने सीपीआर मध्ये उपचार सुरू केले. उपचारा दरम्यानच शुक्रवारी अस्वस्थ वाटू लागल्याने शनिवारी एका खाजगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले. पण ताप अचानक वाढल्याने अर्णव कोम्यात जाऊन काल त्याचा मृत्यू झाला. अर्णवच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…