Home Kolhapur ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करावे- अभिजित तायशेटे

ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करावे- अभिजित तायशेटे

3 second read
0
0
675

राधानगरी प्रतिनिधी, मिलिंद कांबळे

राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी मा. उपसंचालक आरोग्य विभाग कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपसंचालक मुख्य प्रशासकीय अधिकारी नामदेव मोरे यांनी निवेदन स्वीकारले. राधानगरी हे तालुक्याचे ठिकाण असून येथील ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात पण त्यांना खूप अपुऱ्या सोयी सुविधा मिळतात तरी लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय स्थापन करावे अशी आग्रही मागणी करण्यात आली.

या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री,खासदार व आमदार प्रकाश अबिटकर याना देणेत आले आहे.यावेळी दयानंद सावर्डेकर, सम्राट केरकर, नंदकुमार निर्मळे, रवीकिरण सुतार, साईनाथ पाटील,सलमान मुल्लानी उपस्थित होते.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…