Home राजकारण कोल्हापुरात लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी महाडिक कुटुंब सज्ज…

कोल्हापुरात लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी महाडिक कुटुंब सज्ज…

2 second read
0
0
979

कोल्हापूर: कोल्हापूर येथे काल राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची प्रेस कॉन्फरन्स पार पडली. पत्रकारांनी महाडिक यांना लोकसभा निवडणुकी संदर्भात विचारणा केली असता, निवडणुकीसाठी महाडिक कुटुंबीयांची तयारी आहे परंतु याबाबतचा अंतिम निर्णय जो काही असेल तो पक्षश्रेष्ठी घेतील असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

राज्यामध्ये होणारी राजकीय स्थित्त्यांतरे पाहता, आगामी काळामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांचे एकमेकांसोबत जागा वाटपावरून जमेल की परत बिघडेल हे अजून सांगता येत नाही. पण राज्यातील 48 लोकसभा जागांवर भाजपने सर्वेनुसार काम सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन खासदार हे शिंदे गटाचे आहेत. पक्षाकडून दोन्ही खासदारांना तिकीट दिले जाणार की एका खासदारांना भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवावी लागणार अशा देखील चर्चांना उधाण आले आहे.

पुढील निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. पण तरीदेखील मला लोकसभे संदर्भात विचारले तर महाडिक कुटुंबाची यासाठी तयारी असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…