Home Uncategorized गोकुळच्या क्लस्टर बल्क मिल्क कुलर युनिटचा उद्घाटन समारंभ संपन्न

गोकुळच्या क्लस्टर बल्क मिल्क कुलर युनिटचा उद्घाटन समारंभ संपन्न

2 second read
0
0
82

कोल्हापूर गोकुळ दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर प्रणित विजयनगर व्यावसायिक दूध सहकारी संस्था मर्यादित पात्रेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली संचलित क्लस्टर बल्क मिल्क कुलर युनिटचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता धनाप्पाचा वाडा शेटफळे पात्रेवाडी या ठिकाणी पार पडला..


या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार व सांगली जिल्ह्याचे राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष श्री विक्रम सिंह दादा सावंत असुन या कार्यक्रमाचा शुभारंभ गोकुळ दूध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे विद्यमान संचालक किसनराव चौगले, आर के मोरे, प्रकाश पाटील, डी एम् पाटील, अशोक पाटील, खानापूर आटपाडी काँग्रेसचे युवा अध्यक्ष जयदीप भैय्या भोसले तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून अन्य मान्यवर देखील उपस्थित होते.


या कार्यक्रमाला प्रेषक म्हणून वसंतराव यादवराव गायकवाड माजी उपसभापती पंचायत समिती आटपाडी व श्री हणमंत वसंतराव गायकवाड वरिष्ठ व्यवस्थापक महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मुंबई हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…