
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी आज बुधवार रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी एकनाथजी शिंदे यांची मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी लंम्पी आजरासंदर्भात व इतर गोकुळच्या प्रलंबित मागण्याचे मा.मुख्यमंञी महोदय यांचेकडे निवेदन दिले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेवेळी गावाला तत्परतेने लागेल ती सर्व मदत सरकारकडून केली त्याबद्दल संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके, संचालक अजित नरके उपस्थित होते.
यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन मा. श्री. अरुण डोंगळे यांनी संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत कोल्हापूर जिल्हयातील लाखो जनावरांना संघामार्फत मोफत व अल्प दराने औषधोपचार केले जातात. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी आजार वाढत असून जनावरे बाधीत होत आहेत व त्यामुळे दूध उत्पादनाचे प्रमाण घटत आहे. गोकुळ दूध संघामार्फत बाधित जनावरांवर उपचार चालू असून त्यासाठी शासनाकडून खालील प्रमाणे मदत मिळावी.
१.गोकुळ संघाच्या कार्यक्षेत्रामध्ये लंम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत असल्यामुळे यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लंम्पी त्वचा रोग लस(गोटपॉक्स) अंदाजे २.५० लाख डोसेस शासनानामार्फत मिळावेत. जेणेकरून ज्या भागात साथीचा प्रादुर्भाव नाही तेथे त्याचा वापर करण्यात येर्इल.
२. सध्या बाधित जनावरांना गोकुळमार्फत औषध उपचार चालू आहेत. त्याचा खर्च जास्त असून महाराष्ट्र शासनाकडून बाधित जनावरांना उपचार करण्यासाठी औषधे उपलब्ध होऊन मिळावीत तसेच होणारा फैलाव रोखण्यासाठी गोठयामध्ये व गोठ्याबाहेर फवारणीसाठी जंतनाशक औषधे संघास मिळावीत.
३. लंम्पी बाधित जनावरे मयत झाल्यास गायीसाठी ३० हजार,बैलासाठी २५ हजार व पाडयासाठी १६ हजार मयत जनावर अनुदान दिले जाते. याचबरोबर मयत झालेल्या जनावरांना खडयात पुरण्यासाठी १५०० रूपये दिले जाते. सदर अनुदान व सुविधा लंम्पी आजार पूर्ण अटोक्यात येईपर्यंत सुरू ठेवण्यात यावेत .
तसेच गोकुळच्या विस्तारीकरण व दूधभुकटी निर्यातीबाबतचे प्रलंबित अनुदान मिळणेबाबत, पशुखाद्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोलॅसीसवरील २८ टक्के जीएसटी रद्द करावा, संघास भोकरपाडा औद्योगिक वसाहत जि.रायगड येथील भूखंड मिळणे, व संघाच्या प्रलंबित असणा-या विविध प्रस्तावांना मंजुरी मिळणेबाबत संघाच्या मागण्याचे मा.मुख्यमंञी महोदय यांचेकडे निवेदन दिले. यावेळी गोकुळ मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती श्री डोंगळे यांनी दिली.
यावेळी लंम्पि संदर्भात शासन स्तरावर्ती संबंधित विभागकडून माहिती घेऊन योग्य त्या उपाययोजना करणे संबंधिच्या सूचना तात्काळ दिल्या जातील जातील असे सांगितले .तसेंच सदरचे सर्व प्रस्तावाची माहिती संबधित विभागाकडून घेऊन ते मंजुर करण्याचे आश्वासन दिले. व पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि गोकुळ हि कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असुन जिल्हातील शेतकऱ्यांची दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधण्याचे काम गोकुळने केले आहे. तसेच दुग्धव्यवसायाच्या विकासासाठी गोकुळने भविष्या राज्याबाहेरही व्याप्ती वाढवावी व दुग्ध व्यवसायाचा विकास करण्यासाठी गोकुळने पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शन करून व शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोकुळचे चेअरमन मा.श्री. अरूण डोंगळे, माजी आमदार चंद्रदीप नरके, अजित नरके,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, वाशी शाखा डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील,प्रवीण डोंगळे उपस्थित होते.


