Home राजकारण शौमिका महाडिक यांनी विरोधाचा दृष्टीकोन बाजूला ठेवून गोकुळच्या हिताची भूमिका अंगिकारावी – अरुण डोंगळे

शौमिका महाडिक यांनी विरोधाचा दृष्टीकोन बाजूला ठेवून गोकुळच्या हिताची भूमिका अंगिकारावी – अरुण डोंगळे

3 second read
0
0
296

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये कोणताही गैरकारभार झालेला नाही. झालेल्या निवडणुकीत विरोधी आघाडीतून ४ संचालक निवडून आले आहेत. त्यापैकी ३ संचालक राजकारण विरहीत, गोकुळचे हित पाहून संघाच्या कामकाजात सक्रीय सहभागी असून ते सुरु असलेल्या संघ कामकाजाबाबत समाधानी आहेत गोकुळचा कारभार हा दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून सुरू आहे. यामुळे शासकीय लेखा परीक्षणाला विरोध नव्हता परंतु संघाच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक फक्त वैयक्तिक राजकीय हेतूने प्रेरित होऊन हेतुपुरस्सपणे संघाच्या चाचणी लेखापरीक्षणाची मागणी केल्यानेच आम्ही मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सौ.महाडिक संघाच्या दूध उत्पाद्कांची दिशाभूल करत आहेत. त्यांनी सर्वात प्रथम आपण विरोधक आहोत या भूमिकेतून बाहेर यावे आणि आपला विरोधाचा दृष्टीकोन बदलून गोकुळच्या विकासात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि गोकुळच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. गोकुळ दूध संघामार्फत दूध उत्पादकांसाठी भरीव व उल्लेखनिय कामगिरी होत असून संघाच्या कारभाराचे अवलोकन करून लेखापरिक्षकांनी ‘अ –वर्ग’ दिला आहे याची आवर्जून नोंद घेणे गरजेचे आहे. दूध उत्पादक शेतकरी व गोकुळचा सर्वागीण विकास व्हावा म्हणून सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ संघ हिताच्या योजना आखत आहोत. यासाठी गोकुळ दूध संघाशी निगडीत सर्व घटक अहोरात्र आपले योगदान देत आहेत. यासाठी संचालिका महाडिक यांनी केलेल्या प्रत्येक सूचनेचे स्वागत आहे. आमची बांधिलकी ही दूध उत्पादक शेतकऱ्यांशी असून त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. संघाच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागातील कुस्ती व इतर मैदानी खेळ यासाठी सामजिक बांधिलकीच्या भावनेने दूध उत्पादकांना संघाच्या प्रचलित पद्धतीनुसार देणगी दिलेली आहे. गोकुळकडे मागविण्यात येणारी वेगवेगळी सिलबंद टेंडर्स संचालक मंडळाच्या सभेमध्ये संचालकांच्या समोर उघडली जातात. त्यावर उपस्थित सर्व संचालकांच्या सह्या घेतल्या जातात. आलेल्या टेंडर्सच्या दराचा तुलनात्मक तक्ता तयार करून संचालक मंडळ सभेत उपस्थित टेंडरधारकाशी दराबाबत चर्चा होऊन दर निश्चित केले जातात व ज्यांचा दर कमी असेल त्यांना कामाचा ठेका दिला जातो. हि कार्यप्रणाली पूर्वीप्रमाणेच आजही पारदर्शक पध्दतीने केली जात आहे.

‘लम्पी आजार प्रतिबंधित उपाययोजना आखण्यात गोकुळ दूध संघाने कुठेही हलगर्जीपणा केला नाही. सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या बरोबरीने गोकुळने दूध उत्पादकांना व शेतकऱ्यांना सुविधा पुरविल्या आहेत. लम्पीबाधित पशुधनावर उपचार केले आहेत. दूध उत्पादकांत प्रबोधन केले आहे. उपाययोजना आणखी प्रभावी कराव्यात म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. गोकुळचे नेते मंडळी यांच्या माध्यमातून सरकार दरबारी पाठपुरावा केला. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लम्पीबाधित जनावरांसाठी उपाययोजनासंबंधी चर्चा केली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून निवेदन दिले. त्यानुसार तात्काळ कार्यवाही होऊन आर्थिक मदत देणेबाबत शासन आदेश काढण्यात आला. शासनाची रोगनिदान प्रयोगशाळा बंद असल्याने गोकुळच्या रोगनिदान प्रयोगशाळेत लम्पी संदर्भातील सर्व तपासण्या सुरु आहेत. तसेच बाधित जनावरांना गोकुळमार्फत अहोरात्र औषध उपचार सुरु आहेत. गोकुळमार्फत सर्व दूध संस्था व दूध उत्पादक यांच्या संयुक्त प्रयत्नाने जनावरांचे लम्पी त्वचा रोगाबाबत प्रतिबंधात्मक जनजागृती करण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा कारभार हा नियमानुसार सुरु आहे.निविदा प्रक्रीया असो कि वाहतूक ठेका कोठेहि नियमाचे उलंघन केले जात नाही. संचालक मंडळाला विश्वासात घेऊनच धोरणात्मक निर्णय घेतले जातात. तसेच संघातील सर्व मिटिंग नोटीस व संघाच्या विविध कार्यक्रमांची माहिती व निमंत्रण सर्व संचालकांना दिले जाते यामध्ये कोणताही दुजाभाव केला जात नाही. तसेच संचालक मंडळ मिटिंग मध्ये सर्व संचालकांना संकलन, पशुसंवर्धन, पशुखाद्य, मार्केटिंग,डेअरी विभागांचा कामकाजाचा सविस्तर आढावा दिला जातो. संघाच्या नुकत्याच झालेल्या तालुकानिहाय संपर्क सभेचे निमंत्रण सर्व संचालकासोबत त्यांनाही दिले होते परंतु त्या कोणत्याही संपर्क सभेला हजर न राहता आपला वैयक्तिक दौरा काढणार असल्याचे समजते त्यामुळे सौ.शौमिका महाडिक यांनी विरोधाचा दृष्टीकोन बाजूला ठेवून गोकुळच्या हिताची भूमिका अंगिकारावी!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…