Home Uncategorized यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

3 second read
0
0
23

भविष्यातील तंत्रज्ञानाची ओळख आता विद्यार्थ्यांना शाळेच्या वर्गातच करून देण्यात आली आहे. यशस्वी सोशल वेलफेअर फाउंडेशन, कोडोली आणि इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एआय आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे विशेष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
१७ ते २० ऑगस्टदरम्यान कोडोली येथील यशवंत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इन्फोसिसची ‘मेकर लॅब ऑन व्हील’ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची केवळ माहितीच नाही, तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
रोबोटिक प्रोग्रामिंग, ऑटोमॅटिक दरवाजा, ह्युमन सेन्सर यांसह तब्बल ४५ तंत्रज्ञानविषयक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी स्वतः ही प्रात्यक्षिके करून पाहत एआय आणि रोबोटिक्सच्या कार्यपद्धतीचा अनुभव घेतला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तंत्रज्ञानाविषयी कुतूहल आणि नव्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडणारा हा उपक्रम ठरला.
यावेळी यशस्वी सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा विनिता जयंत पाटील, डॉ. जयंत पाटील, सोनाली नेमिष्टे, मंदार पसरणीकर तसेच इन्फोसिस स्प्रिंगबोर्डचे बालाजी भोसले, राजन डांगरे, अजिंक्य मोरे, विजय कोपर्डे आणि किरण जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कुंभोज येथे शिक्षिकेचे विद्यार्थीशी गैर वर्तन – शिक्षणाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश..

हातकणंगले ता . १९ अखंड महाराष्ट्र भर शिक्षणाची तेजोमय ज्योत पसरविणाऱ्या कर्मवीरांच्या कुंभ…