Home Uncategorized ‘गोकुळ’मार्फत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

‘गोकुळ’मार्फत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

17 second read
0
0
146

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने कुमार प्रथमेश मोहन आडनाईक याची मर्चंड नेव्हीच्या अधिकारी पदी निवड झालेबद्दल तसेच कुमारी ऐश्वर्या मोहन आडनाईक हिची इंडिको एअरलाइन्स या कंपनी मध्ये निवड झालेबद्दल या दोघांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते व संचालक मंडळाच्‍या उपस्थित ताराबाई पार्क कार्यालय येथे करण्‍यात आला.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले कि ग्रामीण भागातील मुले व मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असून . जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल करत आहेत.गोकुळ दूध संघ हा नेहमीच अश्या व्यक्तींच्या पाठीशी उभा असतो. कुमार प्रथमेश मोहन आडनाईक तसेच कुमारी ऐश्वर्या मोहन आडनाईक हे दोघे बहिण भाऊ .करवीर तालुक्यातील तामगाव येथील दुध उत्पादक शेतकरी कुटुंबातील असून दोघांची झालेली निवड कौतुकास्‍पद आहे व त्‍यांला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

     याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक,शशिकांत पाटील –चुयेकर,बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील,युवराज पाटील सुजित मिनचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे  संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…