Home Uncategorized  गोकुळ’ मार्फत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

 गोकुळ’ मार्फत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

38 second read
0
0
273

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने अरुण बंडा पाटील रा.खेरीवडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून  पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेबद्दल व जलतरणपटू कुमारी दिक्षा शिरगावकररा.वारणा कोडोली हिने बर्लिन येथे झालेल्या स्पेशल ऑलिंपिक स्पर्धेमध्ये २५ मीटर स्विमिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवलेबद्दल त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थित गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले कि ग्रामीण भागातील मुले मुली  वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवत आहेत . जिल्ह्याचे व देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल करत आहेत. गोकुळ दूध संघ हा नेहमीच अश्या व्यक्तीच्या पाठीशी उभा असतो. गगनबावडा तालुक्यातील पहिले पोलिस उपनिरीक्षक अधिकारी म्हणून अरुण पाटील तसेच जलतरणपटू कुमारी दिक्षा शिरगांवकर गतिमंद असून हिने स्पेशल ऑलिंपिक स्पर्धेमधील केलेली कामगीरी हि कौतुकास्‍पद आहे त्यांच्या भावी वाटचालीस  संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

          यावेळी सत्काराला उत्तर देताना पोलीस उपनिरीक्षक अरुण पाटील म्हणाले कि“ महाराष्ट्र  राज्यातील अग्रगण्य आणि माझ्या कोल्हापूर भूमितील गोकुळ दुध संघात होणारा माझा सत्कार हा माझ्यासाठी अभिमानास्पद व ग्रामीण भागातील तरुणासाठी प्रेरणादायी आहे.” असे उद्गागार त्यांनी याप्रसंगी काढले.        

 यावेळी इंगळी सहकार दूध संस्था इंगळी,ता. हातकणंगले या संस्थेचे दूध उत्पादक अर्जुन कुरले यांचा आदर्श दुध उत्पादक म्हणून गोकुळ संघातार्फे सत्‍कार करणेत आला. त्यांनी स्वतः घरी मुऱ्हा जातीच्या ११ म्हैशी तयार केल्या आहेत. एक यशस्वी दूध उत्पादक म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे , माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील , संचालक बाबासाहेब चौगले,अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले,नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश  पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, युवराज पाटील, राजेंद्र  मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, तसेच सत्कारमूर्तीच्या  कुटुंबातील सदस्य , संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…