Home Uncategorized मलकापूर मधील विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाला चांदीचा मुकुट अर्पण

मलकापूर मधील विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाला चांदीचा मुकुट अर्पण

3 second read
0
1
178

मलकापूर प्रतिनिधी

मलकापूर मधील विठ्ठल मंदिरातील रुक्मिणी,विठ्ठल, सत्यभामा या मुर्त्यांना चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला. कोल्हापुरातील बिंदू चौक येथील परमपूज्य श्री आदिनाथ व्हटकर महाराज व भक्त मंडळ यांच्यातर्फे चांदीचा सव्वा किलो वजनाचा मुकुट अर्पण करण्यात आला.

आषाढी एकादशी निमित्त परमपूज्य श्री आदिनाथ व्हटकर महाराज यांनी साधारण १ लाख २५ हजार रुपयांचा चांदीचा मुकुट हा कोल्हापुरातील सराफ चारुदत्त तारे जोतिबा रोड, महालक्ष्मी मंदिर शेजारी यांनी तयार केला. १ महिना पूर्वीच मुकुटासाठी मापे घेण्यात आली होती. तसेच या मंडळातर्फे वरचेवर मदत करण्यात येत असते. यावेळी विठ्ठल मंदिर मलकापूर अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी असे आवाहन केले आहे की, मंदिराचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून रंगकाम, इलेक्ट्रॉनिक अशा उरलेल्या कामांसाठी भक्तांनी सढळ हाताने मदत करावी.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…