Home Uncategorized यशवंतराव चव्हाण अभ्यास केंद्र परीक्षा संपन्न

यशवंतराव चव्हाण अभ्यास केंद्र परीक्षा संपन्न

4 second read
0
0
283

मलकापूर प्रतिनिधी

मलकापूर ता. शाहूवाडी येथील डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रावर बी. ए. च्या परीक्षा संपन्न झाल्या आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य टी.एन. घोलप यांनी प्रतिनिधीला दिली. यावर्षी बी. ए. भाग १ – १२३ विद्यार्थी, बी.ए. भाग २- १६६ विद्यार्थी आणि बी. ए. भाग ३- १६२ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. अशी माहिती केंद्रसंयोजक डॉ.नामदेव आडनाईक यांनी दिली.

या सर्व परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात संपन्न झाल्या आहेत. यासाठी अंतर्गत भरारी पथक नियुक्त केलेले होते. विद्यापीठाच्या भरारी पथकाने या अभ्यास परीक्षेला भेट देऊन परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरू असल्याचे पाहून अतिशय समाधान व्यक्त केले आहे. परीक्षेची जबाबदारी अभ्यास केंद्र प्रमुख प्रा. टी. एन. घोलप, डॉ. मिलिंद सावळे,तांत्रिक सहाय्यक प्रा. अनिकेत हिरवे, श्री. सुरेश तडवळेकर व आनंदा पाटील यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…