Home Uncategorized अमेनी घाटात एसटी बोलेरो अपघात

अमेनी घाटात एसटी बोलेरो अपघात

4 second read
0
0
244

मलकापूर प्रतिनिधी

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर ते कराड महामार्गावरती अमेनी घाटाजवळ एसटी व बोलेरो पिकप यांच्यामध्ये १२.३० वा. दरम्यान अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

पुण्याहून आमिनी घाटाच्या मार्गे पाचलला जाणाऱ्या एसटी व गोव्याहून मुंबईला जाणारी बोलेरो पिकप यांच्यामध्ये जोरदार धडक झाली. गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या बोलोरो पिकप च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने आपघात झाला. एसटीच्या चालकाने प्रसंगवधान राखून गाडीवरती ताबा मिळवला. एसटीच्या समोरील भागाच्या काचांचा मात्र चक्काचूर झाला. याबाबत अधिक तपास शाहूवाडी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…