Home Uncategorized इंस्टाग्राम वरील पोस्ट- तो तरुण शाहूवाडी तालुक्यातून हद्दपार

इंस्टाग्राम वरील पोस्ट- तो तरुण शाहूवाडी तालुक्यातून हद्दपार

3 second read
0
0
655

मलकापूर प्रतिनिधी 

 इंस्टाग्रामवरील व्हिडिओला लाईक केल्या प्रकरणी उचत पैकी लहीन येतील सोहेल टिपू सुलतान मालदार या युवकाला शाहूवाडी तालुक्यातून हद्दपार केले असल्याची माहिती शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर केला.   

 पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल टिपू सुलतान मालदार यांने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओला लाईक केले होते. याबाबत त्याच्यावर शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद झाला होता. या घटनेबाबत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सदर युवकावर कारवाई करावी याबाबत निवेदन देण्यात आले होते.    सदर युवकावर यापूर्वी देखील अशा स्वरूपाचा गुन्हा नोंद झाला आहे. हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या जातील अशा स्वरूपाच्या इंस्टाग्राम वरील पोस्टला सोहेल मालदार यांने लाईक केल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याबाबत पोलीस उपअधीक्षक यांनी हद्दपारी बाबतचा प्रस्ताव शाहूवाडी-पन्हाळा उपविभागीय तथा दंडाधिकारी यांच्याकडे  सादर केला होता.

उपविभागीय तथा दंडाधिकारी शाहुवाडी पन्हाळा यांनी सोहेल टिपू सुलतान मालदार यास शाहूवाडी तालुक्यातून पासून हद्दपार केले असल्याची माहिती शाहूवाडी पोलीस ठाने यांनी दिली. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याबाबत सर्वांनीच सतर्कता घेण्यात यावी. हिंदू मुस्लिम बांधवांनी शांततेचे सहकार्य करावे असे आवाहन शाहूवाडी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…