Home Uncategorized वालूर ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

वालूर ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

2 second read
0
0
445

मलकापूर प्रतिनिधी:

राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावच्या विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांचे हित नजरेसमोर ठेवून येथील ग्रामपंचायतीने चौफेर विकास साधला आहे असे गौरव उद्गार माझी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील यांनी काढले. ते वालूर येथील गौरव समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच नूरूद्दीन झांजी गुरूजी होते. गेले दहा वर्ष सरपंच पदावर राहून राबवलेल्या विकास कामाबाबत वंदना आकाराम पाटील यांचा सत्कार गोकुळ दूध संघाचे संचालक करणसिंग गायकवाड यांच्या हस्ते झाला.यावेळी अन्य ग्रामपंचायत सदस्यांचा गावच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ग्रामपंचायत सदस्यांचा पाच वर्षांचा कालखंड संपला.त्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पार पडला. यावेळी करूंगळेचे सरपंच माधव कळंत्रे, प्रकाश कांबळे, सिताराम पाटील यांनी दहा वर्षांतील विकास कामांचा आढावा मनोगतामध्ये मांडला. स्वागत चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी पंचायत समिती सदस्य अमर खोत,उपसरपंच नाना पाटील,मुबारक ताम्हणकर, केशव पाटील,दत्ता विरळे, धोंडीराम खोंगे,पांडू पाटील,संदिप पाटील चांदोली,महिपती पाटील वारूळ,विजय‌पाटील उचत प्रमुख उपस्थित होते.यावेळी स्नेह‌ भोजन झाले. आभार आकाराम पाटील यांनी मानले.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्य…