Home आरोग्य हुपरीत ब्रह्माकुमारीच्या वतीने आरोग्य निदान व उपचार शिबिराच्या दीडशे वर रुग्णांनी घेतला लाभ.

हुपरीत ब्रह्माकुमारीच्या वतीने आरोग्य निदान व उपचार शिबिराच्या दीडशे वर रुग्णांनी घेतला लाभ.

14 second read
0
0
131

हुपरी  : येथील प्रजापिता ब्रहमाकुमारी ईस्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्राच्या वतीने आयोजित आरोग्य निदान व उपचार  शिबीराचा दीडशे हून अधीक रुग्णांनी लाभ घेतला .यावेळी गुजरात हून या कार्यात 26 वर्षे योगदान दिलेले तज्ञ  डॉक्टर आले होते .प्रारंभी सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी सुनिता दिदी यानी विद्यालयाचे कार्य आणी या शिबिराचे महत्व विशद केले .

सकाळी 9 ते सायं 6 पर्यंत आरोग्य शिबीर संपन्न झाले. यामको डॉ. राजू  व डॉ. शाम  बडोदा (गुजराथ) यांचा सक्रीय सहभाग होता. प्रथम बी. के. सुनिता दीदी, डॉ. राजू व डॉ. शाम व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाद्वारे शीबराची  सुखात झाली  .यावेळी  डॉ. शाम (बड़ोदा) यांनी निरोगी जीवनात सकस , योग्य आहाराचे महत्व विशद  केले .तसेच डॉ. राजू यांची सहज, सोपे व्यायाम प्रकार करुन  असाध्य, दीर्घ अशा  कंबरदुखी, गुडघेदुखी आणि इतर आजार बरे करू शकतो हे प्रत्यक्षकि दुरून दाखविले. गेल्या 26 वर्षामध्ये लाखो रुग्णांना बरे केले  याचे अनूभवा द्वारे  कथन केले तसेच सातत्याने व्यायाम करणे किती महत्वाचे आहे याचे महत्व सांगितले . शुगर, बीपी आणि अनेक आजारांमध्ये पालेभाज्या, व शकाहाराचे किती महत्त्वपूर्ण योगदान आहे हे सांगतांना काही प्राणायाम प्रत्यक्ष सामूहिक करून दाखविले. आहार, विहार थोडासाच पण सातत्यपूर्ण, योगासन, प्राणायाम, व्यायाम अध्यात्मिक वैचारिक चिंतन हे आजार बरे करण्यास किती महत्वाचे आहे हे स्वतःच्या प्रत्यक्ष अनूभव कथन केले .यावेळी डॉ. एकांडे, डो औंधकर , दिलीप जाधव ,  अप्पासाहेब  देसाई, पट्टणकडे गुरुजी,  खोत सर, बिके  वसंत चौगलें,  सदाशिव देसाई, अरविंद गायकवाड , यांच्यासह  ईश्वरीय परीवार उपस्थित होते. ‘दिवसभरात  150 रुग्णांचे मोफत निदान, प्रथम उपचार व मार्गदर्शन करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…