Home Uncategorized ४ जून रोजी ‘पारगड हेरिटेज रन’ चा थरार…!६ गटात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा

४ जून रोजी ‘पारगड हेरिटेज रन’ चा थरार…!६ गटात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा

6 second read
0
2
605

ता. चंदगड :

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धन व लोक प्रबोधनासाठी ‘पारगड हेरिटेज रन’ नावाने अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. किल्ले पारगड जनकल्याण संस्था मुंबई, पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ॲडव्हेंचर एल एल पी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जून २०२३ रोजी होणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा देशभरातील धावपटूंसाठी एक आव्हान ठरणारी आहे. स्पर्धेचे यंदा सलग दुसरे वर्ष असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पारगड किल्ल्यावरून स्पर्धेत सहभागी होण्याचा अनुभव धावपटूंसाठी रोमांचकारी असेल.


स्पर्धा ‘जॉय ऑफ जंगल’, ५ किमी (८ वर्षांवरील मुले-मुली). ‘जंगल ड्रीम रन’, १० किमी (१३वर्षांवरील) व ‘जंगल हाफ मॅराथॉन’, २१ किमी ( १६ वर्षांवरील) अशा तीन श्रेणीमध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र आहे. पारगड हेरिटेज रन ‘निसर्गाचे रक्षक मोहिम’ अंतर्गत निसर्ग संवर्धन, वृक्ष लागवड, पाणी संवर्धन, कचऱ्याचे पुनर्विनीकरण, नैसर्गिक ऊर्जा कार्यक्षमता या पाच उद्दिष्टांच्या प्रबोधना बरोबरच क्रीडा, शारीरिक शिक्षण व युवक कल्याण विषयक उपक्रमांसाठी जनजागृती निर्माण व्हावी व महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जावा या हेतूने संस्था कार्यरत आहेत.
स्पर्धा वेळापत्रक पुढील प्रमाणे- ४ जून सकाळी ५ वाजता स्पर्धकांचे आगमन, कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती व नाष्टा, ६ वाजता उद्घाटन, ७ वाजता स्पर्धेची सुरुवात, ९ ते ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण, मार्गदर्शन व परिसरात वृक्षारोपण होणार आहे. यावेळी चंदगड चे आमदार राजेश पाटील, स्टाफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन चिरमुरे व तालुक्यातील सर्व विभागांचे प्रमुख, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू उपस्थित राहणार आहेत. सहभागी सर्व धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र, फळ झाडाचे रोपटे व टी-शर्ट दिले जाणार असून सहा गटातील विजेत्या अनुक्रमे तीन स्पर्धकांना पदक व रोख बक्षीसे दिली जातील.


स्पर्धेची सुरुवात व सांगता भवानी मंदिर पारगड येथे होणार असून स्पर्धा मार्गावर पहिला चेक पॉईंट विठ्ठल रुक्मिणी मंदिर नामखोल, दुसरा चेक पॉईंट सातेरी मंदिर तेरवण, अंतिम चेक पॉईंट राम घाट येथे ठेवण्यात आला आहे.
स्पर्धा मार्गावर रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा, रेस मार्शलच्या नजरेखालील चेक पॉईंट, पिण्याचे पाणी, ग्लुकोज आदी सुविधा उपलब्ध राहतील. स्पर्धक व क्रीडा प्रेमींना पारगड वर येण्यासाठी चंदगड आगारातून सकाळी साडेचार व पाच वाजता एसटी बसची व्यवस्था केली असून या बस मार्गावरील सर्व थांब्यावर थांबतील.
कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश विनामूल्य असून ऑनलाइन नोंदणी व अधिक माहितीसाठी www.pargad.in या वेबसाईटला भेट द्यावी. असे आवाहन स्पर्धा प्रमुख प्रवीण चिरमुरे व किल्ले पारगड जनकल्याण संस्थेच्या वतीने कर

कोल्हापूर कारभार प्रतिनिधी
विशाल श्रीकांत पाटील, कालकुंद्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…