Home Uncategorized अनुस्कुरा येथे स्वाभिमानी संघटनेचा मेळावा

अनुस्कुरा येथे स्वाभिमानी संघटनेचा मेळावा

4 second read
0
1
335

मलकापूर प्रतिनिधी

शाहुवाडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने, अनुस्कुरा तालुका शाहूवाडी या ठिकाणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी, त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी संघटनेचे महत्त्व पटवून देताना राजू शेट्टी म्हणाले, आपण आपल्या प्रश्नाकडे गांभिर्याने बघत नसल्यामुळे, संघटनात्मक काम न केल्यामुळे आपले प्रश्न सुटत नाहीत, स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या पायातले पायतान घट्ट असलेल्या मुळे प्रश्न मार्गी लावण्याची धमक कार्यकर्त्यांमध्ये असते. संघटनात्मक काम करताना तुमचा हेतू शुद्ध व नियत साफ असणे आवश्यक आहे. कठीण प्रश्न सुध्दा सूटल्याशिवाय रहात नाहीत असे शेट्टी यांनी बोलताना सांगितले.

यावेळी उपस्थित स्वाभिमानी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, विजय पाटील, संजय पोवार, युवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. संजय पोवार करंजफेण, हरिश्चंद्र कांबळे मोसम यांनी संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला. अजित साळोखे, गुरुनाथ शिंदे, संजय केळस्कर, बाजीराव सुळेकर, रंगराव चिले, अर्जुन पाटील, काशिनाथ नारकर महाराज, डे.सरपंच दीपक पाटील, राजाराम शिवगण, राजाराम कातळे, काशिनाथ पाटील, अजित काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…