Home Uncategorized शाहुवाडी गणेश नगर मध्ये चोरी

शाहुवाडी गणेश नगर मध्ये चोरी

3 second read
0
0
366

मलकापूर प्रतिनिधी

शाहुवाडी मधील गणेश नगर येथे भाड्याच्या घरात राहणारे मोहसीन शहाजहान मुलांनी वय 32 यांच्या घरी रात्री बारा ते तीनच्या सुमारास साधारण दोन लाख रुपयांची चोरी झाली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहसीन मुलांनी यांचा सायकल गॅरेजचा व्यवसाय असून त्यांचे मूळ गाव उचत ता. शाहूवाडी आहे, ते शाहूवाडीतील गणेश नगर या ठिकाणी भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान खिडकीची जाळी कापून घरातील दरवाजाची कडी काठीने काढून घरात प्रवेश केला. घरातील तिजोरी मधील असलेल्या लॉकर मध्ये असलेली रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने, जसे एक लाख 52 हजार रुपये रोख रक्कम, 35 हजार रुपये सोन्याची गोफ चेन, 2 हजार रुपयाची चांदीची चैन, 1 हजार पाचशे रुपयांची चांदीची दोन ब्रेसलेट असा, 1 लाख 90 हजार 500 रुपये यांची चोरी केली. याची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…