Home Uncategorized भाजपा कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी ?

भाजपा कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी ?

3 second read
0
2
1,300

पुढील काळात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीचा विचार करून संघटनात्मक बांधणी भक्कम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रयत्न जारी केले आहेत. या संघटनात्मक निवडीत कोल्हापूर जिल्ह्यासाठी तीन जिल्हाध्यक्ष लाभणार असून कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलय. यापूर्वी कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशी दोन पदे आहेत,..

यामध्ये हातकणंगले ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाच्या नेमणुकीला केंद्रीय कार्यकारिणीने मंजुरी दिली आहे.. कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि हातकणंगले ग्रामीण जिल्हाध्यक्ष या तीनही पदांच्या निवडी साधारणतः 20 मे पर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्हाध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलय.

सध्या राहुल चिकोडे यांची कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष पदाची मुदत संपलेली असून कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी महापौर दीपक जाधव, माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी अजित ठाणेकर जिल्हा सरचिटणीस विजय जाधव विद्यमान अध्यक्ष राहुल चिकोडे इत्यादीजण इच्छुक असल्याच दिसून येते.. पण या सर्वांच्या मध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी दीपक जाधव यांच्या नावाची चर्चा लोकांच्या मध्ये होताना दिसून येते.. कारण दीपक जाधव यांच्या पाठीमागच्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर दीपक जाधव हे माझी महापौर असल्याने प्रशासनाचा त्यांना उत्तम अनुभव आहे त्याचप्रमाणे त्यांच्या घरामध्ये गेले कित्येक वर्ष नगरसेवकाचे पद देखील आहे आजूबाजूच्या भागात वजन असल्यामुळे तसेच जनतेशी मोठ्या प्रमाणात संपर्क असल्याने दीपक जाधव यांचं नाव जिल्हाध्यक्षपदी घेतलं जाईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. पण भाजपा शिस्टमंडळ कोणता निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…