Home Uncategorized शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ विद्यार्थी सहाय्यता उपक्रम

शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ विद्यार्थी सहाय्यता उपक्रम

4 second read
0
0
166

शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी, शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये, या हेतूने गेले 20 वर्ष विद्यार्थी सहाय्यता उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती ,पाठ्यपुस्तके खरेदी, शालेय फी तसेच शिक्षणासाठी आवश्यक असलेली शक्य ती मदत देण्यात येते. हजारो विद्यार्थ्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ झाला आहे.

शैक्षणिक व्यासपीठाचे कायमस्वरूपी आश्रयदाते यासाठी पुढाकार घेत असतात. मलकापुरातील चंद्रशेखर उर्फ पिंटू शिंत्रे यांनी आज कुमारी सायली पाटील या इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला शैक्षणिक पाठ्यपुस्तके वितरित केली. चांगुलपणाच्या मदतीची ही चळवळ पुढे न्यावी याकरिता व्यासपीठाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. चंद्रशेखर उर्फ पिंटू शिंत्रे यांच्या विद्यार्थी हिताच्या उपक्रमाच्या सततच्या सहभागाबद्दल शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर मनःपूर्वक आभारी आहे, असे व्यासपीठातील सदस्यांनी सांगितले.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…