Home Uncategorized डॉ.व्ही.टी.पाटील फाउंडेशन द्वारा आरोग्य कीट सेवा केंद्रे स्थापन

डॉ.व्ही.टी.पाटील फाउंडेशन द्वारा आरोग्य कीट सेवा केंद्रे स्थापन

3 second read
0
0
164

मलकापूर प्रतिनिधी

कोल्हापूर येथील डॉ.व्ही.टी.पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून व किर्लोस्कर आईल इंजिन्स कंपनी कागल यांच्या सी.एस.आर.निधीतून शाहूवाडी या दूर्गम भागात १४ गावातून आरोग्य कीट सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली. स्वयंसिध्दा औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री गायकवाड यांच्या हस्ते हे किट, महिला बचत गटाच्या पदाधीकाराकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी गायकवाड म्हणाल्या, दूर्गम भागात वयोवृद्ध रूग्णांना सोईचे ठरेल असे साहीत्य सेवा केंद्रांच्या रूपाने उपलब्ध केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक बचत गटांनी गावातील रूग्णांना सदर साहीत्य गरजेनुसार वापरण्यास उपलब्ध करावे.

गरजूनी याचा लाभ घ्यावा. गांडूळ खत निर्मिती व भाजीपाला बगिचा याद्वारे सेंद्रिय खत वापराची मानसिकता ग्रामीण भागात रूजवली जात आहे.शित्तूर वारून, कांटे, उदगिरी, अनुस्कूरा, बुरबाळ, मालाईचा धनगरवाडा, सुकामाळ, केंबुर्णेवाडी, दिवाणबाग, धाऊडवाडा, तळवडे,आंबेवाडी,माळेवाडी या वस्त्यावरील बचत गटांनी सदर साहीत्य सेवा केंद्र म्हणून सुरू केली आहेत. चाळीशीनंतर चे आरोग्य यावरील ५ पुस्तकांचा संच महिला बचत गटांना सुपूर्द केला. संस्थेने साहीत्याची देवघेव रजिस्टर देवू केले.यापूर्वी या गावातून विद्यार्थी व पालकासाठी मोफत आरोग्य शिबीर राबवले.

जंगल भागात असलेल्या येथील १४ शाळांना स्नेक कचर उपलब्ध केला. याच्या वापरातून सापाला सुरक्षित पकडून जंगलात सोडले जात आहे. ५ शाळेतून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प राबवून सेंद्रिय शेती पिकवणारी जागृती केली जात आहे. २ गावातून विषमुक्त भाजीपाला बगिचा उपक्रमातून ४० प्रकारची भाजीपाला लागवड यशस्वी केली. संस्थेच्या प्रमुख कांचनताई परूळेकर यांच्या संकल्पनेतून दुर्गम भागात हे उपक्रम राबवण्यात आले.यावेळी उपस्थित मिताली बेर्डे, सायली लाड, दशरथ आयरे, अनिल कांबळे, महात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…