Home Uncategorized शाहूवाडीत मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

शाहूवाडीत मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

3 second read
0
0
73

महामानव क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती शाहूवाडी तालुक्यात विविध पक्ष विविध आंबेडकरी संघटना तहसील कार्यालय पोलीस स्टेशन राजश्री शाहू सुविधा केंद्र पंचायत समिती मलकापूर नगरपंचायत त्याचबरोबर शासकीय निमशासकीय कार्यालये विविध संस्थांचे कार्यालये या सर्वांच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी शाहूवाडी पंचायत समितीच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास सकाळी सात वाजल्यापासून दिवसभर पुष्पहार अर्पण करून कार्यकर्ते अभिवादन करीत होते.

विविध पक्ष आणि विविध संघटनेच्या वतीने एकत्र येऊन मलकापूर येथील सुभाष चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मलकापूर ते शाहुवाडी पर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी विविध पक्षांचे विविध संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. पंचायत समिती शाहुवाडी येथे सुरज माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन राजेंद्र डोंगरे आणि माजी सरपंच सागर कांबळे यांच्या वतीने कार्यकर्त्यांच्या साठी अल्पोपआहाराची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. भव्य मोटरसायकल रॅली, त्याचबरोबर लहरणारे निळे झेंडे ,निळे टी-शर्ट आणि बाबासाहेबांचा जयघोष यामुळे संपूर्ण शाहुवाडी तालुक्यात गावागावात वातावरण आज प्रसन्न असे वाटत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…