Home राजकारण राजारामवर खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांना खड्यासारखे बाजूला करा – स्वाभिमानीचे वैभव कांबळे यांचा घणाघात

राजारामवर खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांना खड्यासारखे बाजूला करा – स्वाभिमानीचे वैभव कांबळे यांचा घणाघात

3 second read
0
0
204

राजाराम साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ हातकणंगले तालुक्यातील लाटवडे गावामध्ये सत्ताधारी सहकार आघाडीची प्रचार सभा झाली. या सभेला खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, अशोकराव भगवानराव पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, अमरसिंह पाटील, माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी राजाराम कारखान्याच्या कारभाराचे कौतुक केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राजाराम कारखान्यावर दरासाठी कधीही आंदोलन करावे लागले नाही, अशा शब्दात त्यांनी कारखाना प्रशासनाचा गौरव केला. आता काही विरोधक कारखान्याच्या वजन काट्यावरून खोटे आरोप करत सुटले आहेत पण मी साक्षीदार आहे राजाराम कारखान्याचा वजन काटा चोख आहे. राजारामची नाहक बदनामी करणाऱ्या विरोधकांना या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला काढा, असे आवाहन कांबळे यांनी केले.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…