

पन्हाळा तालुक्यातील येवलुज येथे झालेल्या प्रचार सभेत अंमल महाडिक म्हणाले दरवेळी निवडणुकीच्या तोंडावर उठायचे आणि सभासदांना कळवळा असल्याचे सोंग करायचे अशी बंटी पाटील यांची सवय आहे पण आता सभासदांनी त्यांचे ढोंग ओळखले आहे. येऊनच येथे झालेला प्रजासभेत राजाराम कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ सहकार आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. येवलुज येथे झालेल्या सभेत अंमल महाडिक यांनी विरोधकांना चांगलं झोडपलं. दरवेळी एकच कॅसेट वाजवणाऱ्या बंटी पाटलांनी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अजूनही दिलेली नाहीत. मात्र आम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे. गावोगावी उत्तराचे डिजिटल फलक उभारले आहेत आणि बंटी पाटील मात्र पळ काढत आहेत त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे डिजिटल डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त केला
जाहिरात
