Home Uncategorized गोरक्षनाथ यात्रेनिमित्त पेरीड येथे 18 एप्रिल रोजी भव्य कुस्ती मैदानाचा आयोजन

गोरक्षनाथ यात्रेनिमित्त पेरीड येथे 18 एप्रिल रोजी भव्य कुस्ती मैदानाचा आयोजन

3 second read
0
0
78

मलकापूर प्रतिनिधी     

पेरीड तालुका शाहुवाडी येथे गोरक्षनाथ यात्रेनिमित्त 18 एप्रिल रोजीभव्य असे कुस्ती मैदान आयोजित केले आहे. प्रथम क्रमांकाची लढत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध राष्ट्रीय विजेता माऊली कोकाटे यांच्यात होणार असल्याची माहिती निमंत्रक सर्जेराव पाटील यांच्यासह यात्रा कमिटी संयोजकांनी दिली.   

 प्रति वर्षाप्रमाणे गोरक्षनाथ यात्रेनिमित्त पेरिड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. 18 एप्रिल मंगळवार रोजी दुपारी ३ वाजता कै. मारुती भाऊ पाटील कुस्ती आखाड्यात कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. प्रमुख लढती बरोबरच अन्य 70 अशा चटकदार नेत्र दीपक कुस्त्या होणार आहेत. त्याबरोबरच शाहुवाडी तालुक्यातील सर्वोत्कृष्ट कुस्ती मल्लास शाहूवाडी तालुका कुस्ती पारितोषक  दिल जाणार आहे. या कुस्ती मैदानाचा कुस्ती प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन निमंत्रक माजी बांधकाम आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील  यांच्यासह यात्रा कमिटीचे सर्व सदस्य यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…