आई - वडिलांचे जीवनातील स्थान खूप अमूल्य आहे. मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते खूप कष्ट घेतात. आणि आपल्या मुलांना घडवतात. या आई - वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन मुलांनी वागले पाहिजे. त्याच्या विश्वासाला तडा न जाऊ देता, आपल्या मुलांच्या अभिमानाने समाजात त्यांची मान नेहमी ताठ राहील, याचा विचार करून मुलांनी वागले पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केले. …