Home राजकारण सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्षं करण्यास मुख्यमंत्री अनुकूल, तर अधिकाऱ्यांच्या बैठकीत शिंदेंचा सकारात्मक प्रतिसाद

सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्षं करण्यास मुख्यमंत्री अनुकूल, तर अधिकाऱ्यांच्या बैठकीत शिंदेंचा सकारात्मक प्रतिसाद

3 second read
0
0
236

निवृत्तीच वय 60 वर्षं करण्याच्या मागणीवर सरकार विचार करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबद्दल अनुकूल आहेत असंही समजतंय. महासंघाची गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीतच, निवृत्तीचं वय 60 वर्षं करण्याला मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली. सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे 60 करण्याबाबत अधिकारी महासंघाने बैठकीत भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अनुकुलता दर्शवली आहे. सेवानिवृत्ती उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे 20 लाख करणे, 80 वर्षे वयावरील वरिष्ठ सेवानिवृत्तांना केंद्राप्रमाणे निवृत्तीवेतन वाढ देणे आदी मागण्यांबाबत देखील सकारात्मक चर्चा झाली. चर्चा झालेल्या उपरोक्त सर्व मागण्याबाबत शासन निर्णय प्राधान्याने व्हावेत, अशी आग्रही भूमिका महासंघाच्या वतीने बैठकीत स्पष्ट करण्यात आली.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…