Home Uncategorized मार्केट कमिटीतील बैठकीत राजकीय विरोधक…सैनिक टाकळी एमआयडीसीला विरोध की आमदार यड्रावकरांना राजकीय विरोध? बैठकीनंतर शिरोळ तालुक्यात चर्चा

मार्केट कमिटीतील बैठकीत राजकीय विरोधक…सैनिक टाकळी एमआयडीसीला विरोध की आमदार यड्रावकरांना राजकीय विरोध? बैठकीनंतर शिरोळ तालुक्यात चर्चा

3 second read
0
1
34

सैनिक टाकळी येथे प्रस्तावित शासकीय एमआयडीसीच्या मुद्द्यावरून शनिवारी शिरोळ तालुक्यात राजकीय विरोध पाहायला मिळाला. एमआयडीसीला विरोध असल्याचे सांगत तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. मात्र, त्यानंतर रत्नपाण्णा कुंभार मार्केट यार्ड येथे झालेल्या बैठकीत आंदोलकांच्या पेक्षा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना वारंवार विरोध करणारे राजकीय पुढारी बैठकीत उपस्थित असल्याने या आंदोलनाला राजकीय वळण मिळाल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. त्यामुळे हा विरोध प्रस्तावित एमआयडीसीला आहे की आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आहे ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या संदर्भात चर्चेच्या उद्देशाने मार्केट यार्ड येथे शनिवारी दुपारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची उपस्थिती होती. मात्र, एमआयडीसीला विरोध करणाऱ्या सैनिक टाकळीतील स्थानिक नागरिकांची संख्या बोटावर मोजण्याइतपत होती, त्याउलट आमदार यड्रावकर यांना सातत्याने विरोध करणारे काही राजकीय चेहरे अधिक ठळकपणे उपस्थित होते.
सैनिक टाकळी येथे एमआयडीसी झाल्यास स्थानिक युवकांना रोजगार, महिलांसाठी उद्योगाच्या संधी आणि परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे विकासाच्या प्रकल्पाला विरोध करण्याऐवजी नागरिकांच्या शंकांचे निरसन करून सकारात्मक मार्ग काढण्याची भूमिका आमदार यड्रावकर यांच्याकडून वारंवार मांडली जात आहे.
दरम्यान, एमआयडीसीच्या नावाखाली सुरू असलेल्या आंदोलनामागे स्थानिकांचा खरा प्रश्न किती आणि राजकीय विरोध किती ? याबाबत तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पन्हाळा कुमार विद्यामंदिरमध्ये शालेय व्यवस्थापन समितीची निवड; भाजप तालुकाध्यक्षांकडून शाळेला संगणक भेट

पन्हाळगडावरील 99 वर्षे पूर्ण केलेली जिल्हा परिषदेची सर्वात जुनी शाळा कुमार विद्यामंदिर पन्…