Home Uncategorized गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

4 second read
0
0
25

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कर्मचारी सहकारी पतसंस्थेने आपल्या पारदर्शक आणि गतिमान कारभाराच्या जोरावर १६५ कोटी रुपयांच्या उलाढालीचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. यावर्षी 101.28 कोटी रुपये इतके खेळते भांडवल झाले आहे. संस्थेची ही प्रगती सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे फळ असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या चेअरमन माधुरी बसवर यांनी केले.

येथील मुख्य कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख मांडण्यात आला.

सभासदांचे हित हेच आमचे ध्येय – माधुरी बसवर
या यशाबद्दल माहिती देताना चेअरमन माधुरी बसवर म्हणाल्या की, “गोकुळ कर्मचारी पतसंस्थेने स्थापनेपासूनच सभासदांच्या आर्थिक गरजांना प्राधान्य दिले आहे. केवळ १६५ कोटींची उलाढाल करणे हेच आमचे उद्दिष्ट नसून, सभासदांना कमीत कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करणे आणि त्यांच्या ठेवींवर सुरक्षित व अधिक परतावा देणे याला आम्ही महत्त्व दिले आहे. येणाऱ्या काळात संस्थेचे पूर्णपणे संगणकीकरण करून सभासदांना अधिक आधुनिक सेवा देण्याचा आमचा मानस आहे.”

१०० कोटींचे खेळते भांडवल : संस्थेने चालू आर्थिक वर्षात हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

सभासदांनी संस्थेच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब केल्याने संस्थेच्या ठेवी 63 कोटी 10 लाख रुपये इतक्या झाल्या आहेत. याचबरोबर 95 कोटी 47 लाख रुपये इतके कर्ज
वाटप केले आहे. गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज आणि आपत्कालीन गरजांसाठी सभासदांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. यापूर्वी नियमित कर्ज मर्यादा 10 लाख रुपये व प्रासंगिक कर्ज 2 लाख दिले जाते नियमित कर्जामध्ये वाढ करून ते 13 लाख इतके करण्यात येणार असून वार्षिक 9% व्याजदराने कर्ज पुरवठा केला जात आहे.

वसुलीचे प्रमाण उत्कृष्ट असल्यामुळे एन.पी. ए चे प्रमाण नगण्य आहे त्यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे.

चेअरमन बसवर यांनी पुढे नमूद केले की, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील(आबाजी), अरुण डोंगळे यांच्यासह गोकुळ चे सर्व संचालक मंडळ, पतसंस्थेचे सर्व संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच हे यश साध्य झाले आहे. संस्थेच्या या यशाबद्दल सहकार क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

दुग्धतंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोकुळ दूध संघ तसेच इंडियनडेअरी असोसिएशनचे…