Home Uncategorized शिरोळमध्ये उद्या रविवारी राजर्षी शाहू विकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा

शिरोळमध्ये उद्या रविवारी राजर्षी शाहू विकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा

3 second read
0
0
25

शिरोळ :
शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू विकास आघाडी व मित्र पक्षांचा संयुक्त कार्यकर्ता मेळावा रविवारी दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ४.०० वाजता शिरोळ येथील टारे हॉल येथे होणार असून, या मेळाव्यास राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्व उमेदवार तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या कार्यकर्ता मेळाव्यास खासदार धैर्यशील माने, शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने निवडणूक रणनीती, प्रचार पद्धती, संघटन बांधणी आणि विकासकामांची माहिती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शिरोळ तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत भरीव विकासकामे करण्यात आली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच ग्रामीण पायाभूत सुविधांच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यात आला आहे.

या विकासकामांचा आढावा घेऊन पुढील काळातील विकासाची दिशा या मेळाव्यात स्पष्ट केली जाणार आहे. या मेळाव्यात महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उमेदवार, युवक व महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…