Home Uncategorized महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी दिगंबर टिपुगडे यांची निवड

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी दिगंबर टिपुगडे यांची निवड

4 second read
0
0
137


कोल्हापूर जिल्हा नाभिक महामंडळाच्या कार्यकारिणीचा कार्यकाल संपल्याने नूतन कार्यकारिणी राज्यपदाधिकारी यांनी मुलाखती घेऊन जाहीर केली . यावेळी शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिगंबर टिपुगडे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य प्रदेशाध्यक्ष दत्ताशेठ अनारसे हे होते . यावेळी स्वागत जिल्हा सरचिटणीस मारुती टिपुगडे यांनी केले. तर जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी आपल्या कार्यकालातील कामाचा लेखाजोखा मांडला . यावेळी व्यासपीठावर राज्य सरचिटणीस दिलीप अनार्थे, राष्ट्रीय उपाध्यक्ष एम आर टिपुगडे आण्णा, प्रदेश सचिव विकास मदने, प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळोखे ,मराठवाडा विभागीय अध्यक्ष विष्णु वखरे पुणे जिल्हाध्यक्ष पै निलेश पांडे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, सांगली जिल्हाध्यक्ष जयवंत सूर्यवंशी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुधाकर आहेर, पुणे शहर अध्यक्ष महेश सांगळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते .
यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून बाबासाहेब काशिद यांची तर महिला जिल्हाध्यक्षा म्हणून मेघाराणी जाधव यांची निवड करण्यात आली .
यावेळी राधानगरी कार्यकारी चिटणीस कुमार शिंदे, संघटक दत्ताजी टिपुगडे,तालुका अध्यक्ष पिंटू संकपाळ, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात टिपुगडे, पांडुरंग भोसले, यांच्या सह पै विलास टेपुगडे, कृष्णात टिपुगडे, राजाराम टिपुगडे, सखाराम टिपुगडे, गणपती टिपुगडे, मनोज टिपुगडे, संपत मर्दाने, आदी मान्यवर व जिल्हा समाज बांधव उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

राधानगरी प्रतिनिधी/ मिलिंद कांबळे राधानगरी : येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती मोठ्या उत्…