Home Uncategorized हातकणंगले महसूल सेवक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन; कामबंद आंदोलनामुळे शासकीय कामकाज ठप्प

हातकणंगले महसूल सेवक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन; कामबंद आंदोलनामुळे शासकीय कामकाज ठप्प

4 second read
0
0
71

हातकणंगले : महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हातकणंगले तालुका महसूल सेवक संघटनेच्यावतीने कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शासकीय कामकाज ठप्प झाले आहे.

अध्यक्ष नितीन कोळी, जिल्हा सचिव नेताजी पाटील, उपाध्यक्ष सातापा रामन्ना, खजिनदार विजय शिंगे, सेक्रेटरी प्रवीण कांबळे, सदस्य महंमद जमादार, अस्लम मुलाणी, अवधूत रानभरे व महसूल सेवक पतसंस्था उपसभापती संदीप पुजारी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनामुळे शासनाच्या ई-पीक पाहणी, सेवा पंधरवडा तसेच इतर नियमित शासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने तातडीने महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

संघटनेचे कार्यकर्ते महंमद जमादार यांनी सांगितले की, “मागण्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असून शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

केके न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…