
कोल्हापूरच्या पालकमंत्री पदी दिपक केसरकर यांचे नाव निश्चित झाले आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच जिल्हानिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. तसेच नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे.
जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :
दिपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया
चंद्रकांत दादा पाटील- पुणे
विजयकुमार गावित- नंदुरबार
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे- सांगली
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत- परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार- हिंगोली
अतुल सावे – जालना, बीड
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर
अशी यादी जाहीर करण्यात आली आहे.


