Home Uncategorized एड्स नियंत्रण पथक मार्फत बाईक रॅली संपन्न..! लक्षवेधी फलकातून केला एड्स मुक्तीचा श्री गणेशा..!

एड्स नियंत्रण पथक मार्फत बाईक रॅली संपन्न..! लक्षवेधी फलकातून केला एड्स मुक्तीचा श्री गणेशा..!

7 second read
0
0
120

12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने एड्स मुक्तीचे विविध कार्यक्रम राबविले जातात. जिल्हा नियंत्रण व प्रतिबंध पथक (दिशा) सी. पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर मार्फत या दिनाचे औचित्य व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे एड्स जनजागृती बाईक रॅली संपन्न झाली.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी नेतृत्व केलेले या बाईक रॅलीचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले.दसरा चौक- खानविलकर पंप- भगवा चौक बावडा -शुगर मिल चौक ते सर्किट हाऊस-ताराराणी चौक -सीबीएस स्टँड ते परत सीपीआर या मार्गावर रॅली संपन्न झाली.
बाईकस्वारांनी हातात धरलेले घोषवाक्य फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी क्लस्टर प्रोग्रॅम ऑफिसर रमेश वर्धन, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे, मकरंद चौधरी,विनायक देसाई, संदीप पाटील, कपिल मुळे,अभिजीत रोटे,सतीश पाटील,राजेश गोदडे, शुभम पाटील,दीपक सावंत, संजय गायकवाड,चंद्रकांत गायकवाड, भगवान कुंभार,जयवंत सावंत यांचेसह एड्स नियंत्रण कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…