Home Uncategorized कुंभोज येथे वारणा नदीला पूर : हातकणंगले तहसीलदार घटनास्थळी,परिस्थितीचा आढावा

कुंभोज येथे वारणा नदीला पूर : हातकणंगले तहसीलदार घटनास्थळी,परिस्थितीचा आढावा

3 second read
0
0
205

कुंभोज (ता. हातकणंगले) :
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारणा नदीला मोठा पूर आला आहे. नदीपात्र तुडुंब भरून वाहत असून काही शेतजमिनी, रस्ते व पाटबंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कुंभोज व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पूरस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेलेकर यांनी आज कुंभोज येथे भेट दिली. त्यांनी नदीकाठावरील भाग, पूरग्रस्त शेतं व पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्यात ग्रामपंचायत सरपंच जयश्री महापुरे, उपसरपंच आप्पासाहेब पाटील, गटविकास अधिकारी सुषमा कांबळे, तलाठी राजेश माळी, कृषी अधिकारी माने मॅडम, पोलीस पाटील मोहम्मद पठाण, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब डोणे, तसेच सदानंद महापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

तहसीलदार श्री. बेलेकर यांनी नागरिकांना पूरस्थितीबाबत प्रशासनाकडून सातत्याने मदत व मार्गदर्शन मिळेल असे सांगितले. तसेच नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे व प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

केके न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…