Home शैक्षणिक छ. शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवांना घेराव- अभाविप

छ. शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवांना घेराव- अभाविप

3 second read
0
0
98

छ. शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पेपर फुटी झालेली आहे. सोबतच आता विविध शाखांचे निकाल लागत असून, यामध्येही मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याचा दिसत आहे.

याबाबतीत वारंवार विद्यापीठ प्रशासनाला निवेदनाच्या माहिती माध्यमातून सूचना देऊनही कोणतीही कारवाई न केल्याने शेकडो आणि विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवांना घेराव घातला. पेपर फुटी प्रकरणातील दोषीवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन, परीक्षा निकालातील असलेला गोंधळ येत्या आठ दिवसात दूर करू असे आश्वासन कुलसचिवांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले.

यावेळी प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, कोल्हापूर महानगर मंत्री दिग्विजय गरड, अमोघ कुलकर्णी, गौरव ससे, माधुरी लढ्ढा, दिनेश हुमनाबादे, स्वप्नील पाटील यांच्यासह शेकडो विद्यार्थी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…