Home Uncategorized सद्गुरू बाळूमामांच्या आदमापूर तिर्थक्षेत्रावर अद्या़यावत धर्मादाय रूग्णालय उभा करता आले तर ते मी माझे भाग्यच समजतो : आरोग्य मंत्री ना प्रकाश आबिटकर

सद्गुरू बाळूमामांच्या आदमापूर तिर्थक्षेत्रावर अद्या़यावत धर्मादाय रूग्णालय उभा करता आले तर ते मी माझे भाग्यच समजतो : आरोग्य मंत्री ना प्रकाश आबिटकर

3 second read
0
0
165

सद्गुरु बाळूमामांचा भक्त वर्ग मोठा असल्याने मोटे धर्मादाय रूग्णालय उभा करून सेवा करण्याची संधी मला मिळाली तर मी माझे मोठे भाग्य समजतो.मी हा सद्गुरु बाळूमामांचा आशिर्वाद समजतो.असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालक मंत्री ना प्रकाश आबिटकर यांनी या तीर्थक्षेत्राच्या सदिच्छा भेटी दरम्यान केले.
सरपंच विजयराव गुरव यांनी आरोग्य सुविधा बाबत तसेच तसेच विकास आराखडाबाबत ना प्रकाश आबिटकर यांना विचारलेल्या प्रश्नावेळी उत्तर देताना ते बोलत होते.
या सदिच्छा भेटीत त्यांनी या विश्वस्थ मंडळाच्या नुतन कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांचा सत्कार केला. तर ना प्रकाश आबिटकर यांचाही सत्कार विश्वस्थ मंडळामार्फत, बाळूमामाचे घोंगडे व काठी देवून करण्यात आला.या भेटीत आदमापूर तिर्थक्षेत्राबाबत अनेक बाबतीत समाधान कारक चर्चा झाली.
यावेळी विश्वस्थ शिवाजी मोरे, बापूसाहेब शिणगारे,आदमापूर चे तंटामुक्त अध्यक्ष एल जी पाटील माजी सरपंच एम डी पाटील, बी एस पाटील, युवराज पाटील अनिल पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…