Home Uncategorized “B.Sc. नंतर करियर संधी आणि रोजगार कौशल्ये” कार्यशाळा डी. आर. माने महाविद्यालय, कागल मध्ये आयोजित.

“B.Sc. नंतर करियर संधी आणि रोजगार कौशल्ये” कार्यशाळा डी. आर. माने महाविद्यालय, कागल मध्ये आयोजित.

6 second read
0
0
80

कागल: अग्रणी महाविद्यालय योजना (२०२४-२५) अंतर्गत देवचंद कॉलेज, अर्जुननगर, यांच्या सहकार्याने डी. आर. माने महाविद्यालय, कागल मध्ये “B.Sc. नंतर करियर संधी आणि रोजगार कौशल्ये” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा वरिष्ठ विद्यान विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली.

कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. एन. एल. कदम उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली. ही कार्यशाळा दोन सत्रात पार पडली.

प्रास्ताविक प्रा. टी. जे. शितोळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. पी. टी. शिंगे यांनी करून दिली. पहिल्या सत्रात बीजभाषक म्हणून डॉ. डी. एम. पोरे (केमिस्ट्री डिपार्टमेंट, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी B.Sc. नंतरच्या करियर संधींबद्दल मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. एस. एन. तायडे (केमिस्ट्री डिपार्टमेंट, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक रोजगार कौशल्ये आत्मसात करण्याचे महत्त्व सांगितले.

या कार्यशाळेसाठी डॉ. सविता देसाई (देवचंद कॉलेज, अर्जुननगर) आणि त्यांचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेसाठी प्रा. टी. एस. नदाफ, वरिष्ठ विद्यान विभागाचे समन्वयक, आणि सर्व सहकारी प्राध्यापक यांचे सहकार्य मिळाले. आभार प्रा. ए. आर. चौगले यांनी व्यक्त केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा कासोटे आणि समृद्धी निकम यांनी केले.

या कार्यशाळेने विद्यार्थ्यांना त्यांच्या करियरसाठी आवश्यक असलेल्या संधींविषयी आणि कौशल्यांच्या महत्त्वाबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…