Home Uncategorized महिलांनी गृहउपयोगी व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनणे हि काळाची गरज – अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)

महिलांनी गृहउपयोगी व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनणे हि काळाची गरज – अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)

4 second read
0
0
55

कोल्हापूर, ता.०८. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या कुंभोज ता. हातकणंगले येथे नवीन गोकुळ शॉपीचे उद्‌घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्‍ते व संचालक डॉ. सुजित मिणचेकर तसेच संघाचे अधिकारी व मान्यवर यांच्या उपस्थित करण्यात आले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, महिलांनी विविध गृहउपयोगी व्यवसाय उभा करून स्वत: स्वावलंबी बनणे हि काळाची गरज असून आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुंभोज गावच्या कुमारी पूजा पोवार या उच्चशिक्षित तरुणीने व्यवसाय म्हणून ‘मातोश्री गोकुळ दुग्धालय’ उभे केले असून हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन श्री डोंगळे यांनी केले.

या शॉपीमध्ये दूध, श्रीखंड, आंबा श्रीखंड, तूप, पनीर, बटर, दही, ताक, लस्सी, दूध पावडर, बासुंदी, फ्लेवर्ड मिल्क व्हॅनिला, पिस्ता, चॉकलेट व स्ट्रॉबेरी तसेच टेट्रा पॅकिंगमध्ये व्हॅनिला व मँगो लस्सी, मसाला ताक इत्यादी दूग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध ठेवले जाणार असून या दुग्धालयामुळे कुंभोज परिसरातील नागरिकांना गोकुळची विविध दर्जेदार उत्पादने उपलब्ध होणार आहेत असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक डॉ.सुजित मिणचेकर, मातोश्री गोकुळ दुग्धालय प्रोप्रायटर पूजा पोवार, मार्केटिंग विभागाचे हणमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, प्रतिक मुळीक तसेच गावातील महिला आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मलकापूर येथे एस.टी. बसथांबा व रात्री १० वाजेची बससेवा सुरू करण्याची मागणी

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: मलकापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष…