Home Uncategorized शिवाजी विद्यापीठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामकरण व्हावे : आमदार डॉ. राजेंद्र पाटील – यड्रावकर

शिवाजी विद्यापीठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामकरण व्हावे : आमदार डॉ. राजेंद्र पाटील – यड्रावकर

3 second read
0
0
98

शिरोळ : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असून, त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख आम्हा शिवप्रेमींना मान्य नाही. त्यामुळे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामकरण करावे, अशी मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदार यड्रावकर व हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी ही मागणी लावून धरली.

शिवाजी विद्यापीठ हे शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. मात्र, विद्यापीठाच्या नावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख होत असल्याने शिवभक्त व विद्यार्थी वर्गामध्ये नाराजी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे दैवत आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान कायम राहावा, यासाठी विद्यापीठाच्या नावात सुधारणा करण्याची गरज आहे, असे आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीची दखल घेतली असून, लवकरच याबाबतीत योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या नामांतराची मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी आणि विद्यार्थी वर्गाने या मागणीचे समर्थन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…