Home Uncategorized यमगे येथे बांधकाम साहित्य वाटप

यमगे येथे बांधकाम साहित्य वाटप

4 second read
0
0
125

कागल प्रतिनिधी ओंकार पोतदार

शेतकऱ्यांच्या आयुष्या मध्ये वैभव निर्माण करणाऱ्या गोकुळ दूध संघाची चौफेर प्रगती सुरू आहे.दूध उत्पादकांसाठी विविध योजना रावबून अमूल दूध संघाच्या धर्तीवर गोकुळ ची वाटचाल सुरू असून भविष्यात गोकुळ दूध संघाला देशातील अग्रेसर दूध संघ बनवण्यासाठी आपण सर्व संचालक मंडळ प्रयत्न करणार आहोत असे प्रतिपादन नविद मुश्रीफ यांनी केले.         यमगे ता कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व हसन मुश्रीफ फौंडेशन यांच्या वतीने बांधकाम कामगारांना विविध साहित्य वितरित करण्यात आले.अध्यक्ष स्थानी बलभीम संस्थेचे अध्यक्ष जयसिंग पाटील होते. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनतेसाठी सर्व योजना कार्यान्वित केल्याचे सांगून भविष्यात सर्वानी मुश्रीफ यांच्या मागे ठाम राहण्याचे आवाहन नविद मुश्रीफ यांनी केले.         स्वागत प्रास्ताविक माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांनी केले.यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी माजी सरपंच शामराव पाटील,युवक राष्ट्रवादी चे अध्यक्ष निलेश शिंदे,प्रकाश सावंत,संजय कोंडेकर,किरण पाटील,राजू सावंत,जी एन पाटील,विशाल पाटील,विजय हुल्ले,अंबाजी पाटील,रणजित पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.आभार दत्तात्रय पाटील यांनी मानले.अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…