Home Uncategorized गाय दूध खरेदी दर 31 रुपये प्रति लिटर करा,आम. अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गाय दूध खरेदी दर 31 रुपये प्रति लिटर करा,आम. अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

3 second read
0
2
264

गाय दुधाचा किमान खरेदी दर 28 रुपये प्रति लिटर वरून 31 रुपये प्रति लिटर करावेत त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना उर्वरित अनुदानाची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत सत्यजित उर्फ नाना कदम देखील उपस्थित होते.

या निवेदनामध्ये आमदार अमल महाडिक यांनी मागील वर्षांमध्ये लंबे आजाराचा प्रादुर्भाव आणि नैसर्गिक संकटामुळे गाय दूध उत्पादकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पावडर बटरचे अनिमित्त गाय दुधाची घटलेली मागणी यामुळे गाय दुधाचा व्यवसाय अडचणीत सापडला त्यांना दिलासा म्हणून शासनाकडून गाय दुधाला अनुदान दिलं होतं.जून 2024 पर्यंतचे अनुदान दूध उत्पादनाच्या खात्यावर जमा झाले त्यानंतर सात रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णयही झाला मात्र नंतरच्या अनुदानाची रक्कम बहुतांश दूध उत्पादकांना प्राप्त झालेले नाहीये काय दूध खरेदीची किमान आधारभूत शासनाकडून कमी करण्यात आला. महापूर आणि अवकाळी पावसाने आधीच शेतकरी अडचणीत असताना या प्रमुख जोडधंदात सुद्धा नुकसानेला सामोरे जावे लागत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासन स्तरावर काही निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याची गरज आहे उर्वरित अनुदानाची रक्कम उत्पादकांच्या खात्यावर त्वरित जमा करावी आणि आणखीन काही काळासाठी अनुदान पूर्वरत घेऊन व्यवसायाला उभारी द्यावी आणि गाय दुधाचा किमान खरेदी दर 28 रुपये प्रतिलिटर वरून 31 रुपये प्रति लिटर करण्या संदर्भात आदेश द्यावेत अशी मागणी यावेळी आम्हाला महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

शिरोळ : प्रतिनिधी खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्…