सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यापेक्षा सर्व सत्ता घरात एकवटून सामान्य कार्यकर्ताना फक्त सतरंज्या उचलणे व पोस्टर लावण्याची कामे लावणार्या मतदारसंघाचा नियोजनशून्य विकास करुन समाजाची अधोगती करणार्यानी.फक्त बगलबच्चांचे हित साधले अशा सत्तापिपासू प्रवृत्तीला या मतदारसंघातून हद्दपार करा व समाजकारणातून राजकारण करणार्या ए वाय पाटील यांना राधानगरी मतदारसंघातून प्रचंड मताने विजयी करुन तालुक्याचा स्वाभिमान जिवंत ठेवा असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी पाटील तारळेकर यांनी कसबा तारळे येथे प्रचारसभेत बोलताना केले प्रचारसभेचा अध्यक्षक्षस्थानी अशोक नगारे हे होते.
यावेळी कौलव जिल्हा परिषद मतदारसंघात ए वाय पाटील यांनी पदयात्रेद्वारे घर टू घर संपर्क साधत आपली उमेदवारी राधानगरी तालुक्यातील अस्मितेसाठी कशी महत्वाची आहे आणि गेले दहा वर्षे उमेदवारी देतो म्हणून कसे फसविले याविषयी आपल्या भावना व्यक्त करुन मतदारसंघाचा विकासासाठी एक वेळ संधी द्या असे आवाहन केले.यावेळी,विवेकानंद पाटील, पृथ्वीराज बुगडे यांनीही मनोगते व्यक्त केलित
स्वागत सचिन पाटील यांनी केले यावेळी अशोक पाटील, शामराव बावडेकर, ईलाही मुजावर प्रकाश बोधे,संजय आंबेकर,बाजीराव पाटील, डाॅ अहमद नाईक,गवस बामणेकर,बाबुराव जनाळे,सुरेश पाटील तानाजी पाटील, उपस्थित होते आभार कृष्णात पाटील यांनी मानले.

राधानगरी तालुक्यातील आरपीआयचा सर्व आंबेडकरी जनतेचा अपक्ष उमेदवार ए वाय पाटील यांना बिनशर्त पाठिंबा आहे असे प्रतिपादन आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव कांबळे सरवडेकर यांनी केले.याचबरोबर या पक्षाचा कार्यकर्तानी पाटील यांचा प्रचारही सक्रियपणे सुरु केला आहे. यावेळी गौतम कांबळे, दिलिप कांबळे, सुदाम कांबळे, भिकाजी कांबळे, बाबुराव कांबळे, प्रकाश कांबळे,तानाजी कांबळे, संग्राम कांबळे, विक्रम कांबळे, नामदेव कांबळे, अशोक कांबळे, राजेंद्र कांबळे ,विलास कांबळे उपस्थित होते.


